Tuesday, June 8, 2010

आभार आणि धन्यवाद!!!


जून १९८४,शनिवार,दुपारी :१० मिनिटांनी माझा या मर्त्य जगात प्रवेश झाल.तो सोहळा साजरा करण्यासाठी काल रात्री ११:५५ पासून ते जवळपास :३० पर्यंत अनेक शुभेच्छुक आप्त् मित्र आणि मैत्रिणिंचे शुभेच्छा दूरध्वनी आणि संदेशांच्या मार्फत मिळाल्या. त्या सर्वाना एकाच वेळी धन्यवाद द्यायचे या हेतूने आजचा ब्लॉग.

रात्रभर शुभेच्छा स्वीकारल्याने नंतर झोप येणार नव्हतिच.तेव्ह आत्मपरीक्षण करण्याचे ठरले. गेल्या २६ वर्षांचा लेखाजोखा मांडतांना अनेक आठवणींचा पट डोळ्यासमोर चलचित्रपटाप्रमाणे सरकून गेला. त्यात अनेक चांगल्या गोष्टीन प्रमाणे नको असलेल्या घटना पण स्वच्छ आठवत होत्या. आई आणि बाबंकडून झालेल्या संस्कारणंत शाळेत मिळालेले धडे आणि नंतर किशोर वयात असताना मित्रांची संगत आणि कॉलेज मध्ये असताना केलेली आणि शिकलेली प्रॅक्टिकल थेअरी यांच्या शिदोरीवर आजपर्यंतचा प्रवास झाला. कधी टक्केटोणापे खोऊन तर कधी शाबासकीची मिळालेली थाप यांसारख्या गोष्टीतून अनुभव विश्व समृढा झाले.


THEY SAY “LIFE IS BEAUTIFUL ” BUT I THINK YOU HAVE TO SACRIFICE A LOT TO MAKE IT BEAUTIFUL.

या २६ वर्षात अनेक भले बुरे अनुभव गाठी शी जमा झाले. आपल्या म्हणणार्या माणसांकडून केसा नी गळा कपला गेला तर अनेक अनोळखी व्यक्ती ऐन वेळी मदतीला धावल्या तेही परतफेडीची अपेक्षा ना करता. कधी तरी अत्यंत कंटाळवाण्या वाटनर्या जीवनाच्या शुष्क वाळवंटात मारुद्यान सुधा अनुभवले. वेळा झॅलेल्या अपघातांमधून कुटुंबाच्या आणि मित्रांच्या मदतीने उभा राहिलो. काही कमावले काही गमावले. पण त्यातून बराच काही शिकायला मिळाले.

तुमच्यासारख्या मित्रांमुळे आणि शुभेच्छा मुळे जगण्याची उमेद वाढते.

तुमचा सहवास आणि शुभेच्छांच्या ओझ्यात राहायला मला नेहमीच आवडेल.



आपला कृपा अभिलाशि,


पवन दिनेश घवी.


Monday, March 29, 2010

२७-०३-२०१०- किल्ले रायगड

महाबळेश्वर की रायगड? या चर्चेत अखेर रायगडाची सरशी झाली आणि भवती न भवती होत, शनिवार दिनांक २७ मार्च रोजी आम्ही (पवन,सिजो,गगन,आशिफ,रोहन,गणेश,विवेक,विन्सी,अशीता) तिथे जायचे मुक्रर केले. चर्चा झाल्या ,गप्पा रंगल्या आणि उरलेल्या वेळात सहलीचे नियोजन करून प्रत्येकी एक ठराविक रक्कम काढण्याचे ठरले. शुक्रवारी संध्याकाळीच गाडीची सफाई,इंधन भरणे,खाण्याचे पदार्थ(फक्त खाण्याचे) विकत आणणे इत्यादी सोपस्कार पूर्ण झाले आणि दुसर्या दिवशी सकाळी ठीक ६:०० वाजता कचेरीजवळ एकत्र यायचे निश्चित झiले.
संस्थाने जरी खालसा झाली असली,तरी संस्थानिकांचा आळशीपणा अंगात मुरल्यामुळे म्हणा ६:४५ (भारतीय प्रमाण वेळेनुसार ६:००) वाजता आम्ही सर्व एकञ अलो. ज्या गाडीने आम्ही जाणार होतो ती विन्सिची वैयक्तिक मालमत्ता असल्याने तिचे सारथ्य ती स्वतः करणार होती.अर्थात बाकी कुणाला चार चाकी गाडी चालवता येत नाही ही गोष्ट निराळी! उदबत्ती लावून गाडीची पूजा केली. चांदणी चौक-मुळशी-तम्हिनी घाटा मार्गे कोकणात उतरायचे आणि निजामपुरच्या फाट्यावरून पाचड कडे कूच करायचे अशी मार्ग क्रमणा आम्ही नकाशात दाखवली होती.
प्रवासाला सुरूवात केल्यापासून १ तासाच्या आत (५५ मिनिटे) मुळशीला पोहोचलों. मागील वर्षीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ज्या ठिकाणी १ वर्षापूर्वी नाश्ता केला होता तिथे जरा वेळ थांबलो. चहा नाश्ता तयार होईपर्यंत धरणाच्या पाण्यात हात पाय धुण्याचा कार्यक्रम सर्वांनी उरकून घेतला. थोडीफार छायाचित्रे घेतली आणि या अल्पविरामानंतर पुन्हा प्रवास सुरू झला. विन्सीच्या सारथ्य बद्दल शंका घ्यायला वाव नसल्याने गाडीत धिंगण्याला ऊत आला होता. ताम्हिनीच्या अवघड घाटात देखील ती सफाईदार पणे गाडी हाकत होती.(याचा साक्षीदार मी स्वतः पुढे बसल्याने मला या पूर्वीही आला होता.)मागील सहलीत ७ वेळा उलट्या काढणार्या प्रशांतची सर्वाना हटकून आठवण येत होती.पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यना जोडणार्या रा.म. १७ वर असणार्या माणगावच्या अलीकडे साधारण १० किमी वर निजामपूर हे गाव आहे.तेथून डावीकडे पाचडला जायला फाटा फुटतो.३२-३५ किमी च्या या प्रवासाला आम्हाला सव्वा तास लागला. अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता आणि उंच -सखल आणि वेडी वाकडी वळणे यामुळे विन्सीच्या गाडी चालवण्याच्या कौशल्याचा कस लागला.
रायगड पासून १ किमी आधी पाचड या गावी महाराजांच्या मातु:श्री जिजाबाई यांची समाधी अहे.तेथे ग्राम पंचायतीने एक छोटेसे उद्यान विकसित केले अहे.तेथुन किंचित पुढे गेल्यावर लगेचच रायगडचा पायथा आम्हाला खुणावू लागला होत.परन्तु रज्जुरथाने जायचे असल्याने आम्ही पायथ्या जवळ न जाता गडाच्या मागच्या बाजूला गेलो. गाडी सावलीत लावून प्रत्येकी १५० रुपयाची ९ तिकिटे काढली आणि झुलत्या पाळण्याची आमची प्रतीक्षा सुरू झाली .कहि वेळातच एकमेकांना जोडलेले २ निळ्या रंगाचे झुले गडाच्या वरच्या बाजूने सरकत खाली अले. रज्जुरथाने (ROPE WAY) पहिल्यांदाच प्रवास करायचा असल्याने प्रत्येकाने आपल्या आवडत्या देवाचे स्मरण करून वर (अर्थात गडावर) जायला सुरूवात केली.५०० मीटर चे हे अंतर कापायला ४ मिनिटांचा अवधी लागतो. तितक्या वेळात अचानक हवेचा दाब कमी झल्याने अशीता आणि विन्सीच्या कानाला थोडी बधीरता आली य छोट्याश्या प्रवासात खाली बघताना मात्रा मनात अंधुक भीती प्रत्येकाला चाटून गेली. गडावर आल्यावर एका उपाहार गृहात थोडा फराळ केला. शनिवारी करत असलेल्या उपवासाला नाइलाजाने त्या दिवशी मला तिलांजली द्यावी लiगलि. काळात दुर्बिन घेऊन मी गडाच्या आसपासचा परिसर बघून घेतलi.खोल आणि अस्ताव्यस्त पसरलेल्या सह्य पर्वत रंगांच्या दरम्यान अगदी लांबच्या डोंगरावर काहीतरी हलताना दिसले होते. दुरबिनीतून पहिल्यानाणतर तो एक झेंडा असल्याचे आढळून आले.
३० लोकांचा समुह जमा झाल्याशिवाय किल्ला दाखवायचा नाही या दळभद्रि नियमाचे उल्लंघन करून आम्हा ९ जणानसह आणखी ४ लोकांना गड दाखवायचा निर्णय तिथल्या मार्गदर्शकाने घेतला. ४०-५० पायर्या चढून गेल्यावर (हे करताना परत प्रत्येकी ५ रु. चे तिकीट घ्यावे लागते.) आम्ही सर्व एका भव्य परंतु पडक्या अवशेषंजवळ आलो.घसi खाकारण्याचा बहाणा करून मार्गदर्शकाने आमचे विचलित लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आणि पढवलेल्या पोपटाप्रमाणे त्याने माहिती देण्यास सुरूवात केली. रायगडावरघडलेल्या प्रसंगात अगदी तो हजार होता आणि त्या सगळ्या प्रकारचे संकलन त्यानेच केले आहे अशा थाटात त्याने आवाजात चढ- उतार आणून आमच्यातल्या काही जन्नाना आकृष्ट करण्यात त्याने यश मिळवले, पणथोडे फार वाचन झल्याने त्याने सांगितलेल्या माहिती ची सत्यता मी पडताळुन पाहत होतो नि १-२ दा त्याला खोट ठरविल्यने मी स्वत्तःच माझी पाठ थोपाटून घेतली. महाराजांच्या ८ राण्यांपैकी ६ राण्याच्या खोल्या,दिवाण-ए-आम,दिवाण-ए-खास,धाण्याचे कोठार,बंदिवनांसाठीचा तुरुंग,७ माजली दीपमाळ,दारूचे(शस्त्रास्त्रे) कोठार,पाण्याचा तलाव,महाराजांचे स्नान गृह आणि त्यालाच जोडुन असलेले स्वच्छता गृह(मार्गदर्शकच्या भाषेत BATHROOM ATTACHED WITH W.C.) त्याने दाखवल्या नंतर आम्हाला त्याने राज दरबारात आमंत्रित केले. महाराजांच्या राज्याभिषेकाचे सांगोपांग वर्णन ऐकून झाल्यानंतर पादञाण काढून आम्ही राजांचे मेघडंबरीतील बैठ्या पुतळ्याचे दर्शन घेतले. नुसता निर्जीव पुतळा पाहुनही मान आदराने तुकवली गेली आणि आपसूकच सगळ्यांच्या तोंडातून एकाच वेळी महाराजांचा जयजयकार राजदरबारात घुमलi. बर्याच दिवसांपासुनचा मानसिक कंटाळा आणि वैचारिक शैथिल्य या घटनेने दूर सरले गेले. गडाची बांधणी,दूरदृष्टी, स्थापत्या कलेचे कौशल्य,जनतेची काळजी या गुणंi बरोबरच राजांचे युद्धा नैपुण्य ,विचारांची झेप आणि प्रत्यक्ष कृती यांचा ठायीठायी अनुभव येत होत. उगाच नाही त्याना जाणता राजा म्हणत.४४ खणी (दुकाने) असलेल्या बाजार पेठेजवळच राजांचा सिंहसन आरूढ पुतळा तळपत्या उन्हात झळाळून दिसत होता. मुद्रेवरचे करारी भाव आणि डोळ्या तील जरब लक्ष वेधून घेत होती.

नमस्कार करून आम्ही निघणiर तेवढ्यात आमच्या मार्गदर्शकाने कवी भूषण याने लिहिलेले शिवगान खरड्या आवाजात गाऊन दाखवले. या भiरवलेल्या वातावरणात मात्र काहीतरी नाही याची जाणीव आम्हाला झाली होती,तेव्हा एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आमच्या बरोबरीने असणार्या जोडप्याने हळूच कुठेतरी पळ काढला होत. त्यांचा शोध घ्यायचा व्यर्थ प्रयत्न आम्ही काही केले नाहीत हे सांगणे न लगे.
त्यांचा नाद सोडून मग आम्ही गडाच्या एका टोकाला असलेल्या जगदिश्वरच्या आणि महाराजांच्या समाधी मंदिराकाडे कूच केलि.जगदिश्वरच्य मंदिरासमोर असलेल्या भग्न नन्दीचे दर्शन घेऊन मंदिराच्या गाभर्यत प्रवेश करते झालो. मित्र परिवार अनेक धर्मीय असला तरीही प्रत्येकाने अगदी मनापासून मंदिरात प्रवेश केला. मी आणि रोहन ने मनापासून "ओम" या मंत्राचे पठान केले.ते झाल्यानंतर अगदी जवळ असणार्या महाराजांच्या पवित्र समाधीचे दर्शन घेतले. जवळच त्यांच्या विश्वासू वाघ्या कुत्र्याची समाधी पहिली.
जवळच असणार्या भिंतीवर संस्कृत आणि पाली भाषेत शिवराज्याभिषेकाविषयीचे वर्णन कोरले होते.एक पायरीवर गडाचे बांधकाम केलेल्या हिरोजी इंदलकरांच्या नावाची पiटी होति. फालतू हव्यासापोटी कापडी फलकावर नाव लिहून तेही पैसे देऊन आपली स्वतःची जाहिरातबाजी करणार्या तथाकथित नेत्यांच्या प्रसिद्धीची आणि बुद्धीची मला त्यावेळी कीव आली.त्यानंतर आमची छायाचित्रे काढून घ्यायची स्पर्धा सुरू झाली.हे चालू असताना खाण्यासाठी आणलेल्या पदार्थांचा एका बाजूला फडशा पडला जात होतi.. वाटेत असणार्या दुकानांमधून सरबत आणि थंड पेयांचा आस्वद ही आम्ही घेत होतो. नंतर मग टकमक टोक,हिरकणीचा बुरूज बघून आमची परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली.हे सगळे बघताना मला आठवण येत होती ती म्हणजे आपल्या आमोघ वाणीने शिवचरित्र जिवंत करणार्या बाबासाहेब पुरंदरे यांची. त्यांच्या कल्पक डोक्यातून उभ्या राहिलेल्या या प्रकल्पामुळे अनेकांना इतिहास ज्ञात झाला.
सलग ४-५ तास झालेल्या तंगडतोडीमुळे नाही म्हणाल तरी प्रत्येकाला थोडा थकवा जाणवायला लागला होता. तेव्हा गडावरच झोप येण्यापूर्वी खाली जाण्याचा सूज्ञ निर्णय आम्ही घेतला आणि ५:३० ला रज्जुरथाने परत खाली आलो. परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली होती. परत येताना पाचाड-माणगाव-निजामपुर्या थोड्या लांबच्या परंतु सुरक्षित मार्गाने प्रवास सुरू केला. रा. म. १७ वर एका ठिकाणी थांबून खाडीत नंगरून पडलेल्या बोटीवर छायाचित्रे घेतली. माणगाव ला आल्यानंतर पोटात ओरडत असणार्या कावळ्यांना पाव भाजीचा नैवेद्य यथेच्छ खाऊ घातल. नंतर मात्र अंधारची पर्वा न करता आणि मुक्कामाला पुण्यात परत यायच्या उद्देशाने वेगाने गाडी चालवून १०:३० च्या सुमारास पुण्यात परत आलो. निगडीला परत यायचे असल्यामुळे मी बाकी सवंगड्यांचा निरोप घेऊन मी बसमध्ये बसलो. आणि घरी परत येताना आणखीन एक घटना घडली की ज्यामुळे मला बस सोडून डेक्कन ला उतरावे लगले. ती घटना सांगेन पण पुन्हा कधी तरी!

(यi लेखामध्ये गडाचे अतिशय त्रोटक वर्णन केले आहे, ते केवळ त्यावर अनेक अभ्यासू आणि ज्ञानी लोकांनी केलेल्या वर्णनामुळे!)

Wednesday, February 17, 2010

आवडलेली काही इंग्रजी वाक्य!!!

आंतरजालावर प्रसिद्ध झालेली आणि मला आवडलेली काही इंग्रजी वाक्य येथे देत आहे.

1.The length of a film should be directly related to the endurance of the human bladder.
2.In journalism, there has always been a tension between getting it first and getting it right.
- Ellen Goodman
3.We judge ourselves by what we feel capable of doing, while others judge us by what we have already done.
- Henry Wadsworth Longfellow
4.It's not the voting that's democracy, it's the counting.
- Tom Stoppard
5.A fanatic is one who can't change his mind and won't change the subject.
6.We confess our little faults to persuade people that we have no large ones.
7.Talking with you is sort of the conversational equivalent of an out of body experience.
8.There are two types of people--those who come into a room and say, 'Well, here I am!' and those who come in and say, 'Ah, there you are.'
9.Patience has its limits. Take it too far, and it's cowardice.
10.Speak when you are angry--and you will make the best speech you'll ever regret.
11.Man is equally incapable of seeing the nothingness from which he emerges and the infinity in which he is engulfed.
12.A magician pulls rabbits out of hats. An experimental psychologist pulls habits out of rats.
13.The first half of our lives is ruined by our parents, and the second half by our children.
14.Man is the only animal that laughs and weeps, for he is the only animal that is struck with the difference between what things are and what they ought to be.
15."When money talks, nobody notices what grammar it uses. "
16.I hate life, I hate death and everything in between just doesn't interest me.
17.I'm not a vegetarian because I love animals. I'm a vegetarian because I hate plants.
18.I don't know the key to success, but the key to failure is trying to please everybody.
19.Women need a reason to have sex. Men just need a place.
- Billy Crystal
20.I know who I am. No one else knows who I am. If I was a giraffe, and someone said I was a snake, I'd think, no, actually I'm a giraffe.
- Richard Gere
21.In great affairs men show themselves as they wish to be seen; in small things they show themselves as they are.
- Nicholas Chamfort
22.A good friend can tell you what is the matter with you in a minute. He may not seem such a good friend after telling.
23.Autobiography is an unrivaled vehicle for telling the truth about other people.
- Philip Guedalla
24.Three o'clock is always too late or too early for anything you want to do.
25.Today you can go to a gas station and find the cash register open and the toilets locked. They must think toilet paper is worth more than money.
- Joey Bishop
26.You don't get anything clean without getting something else dirty.
27.In archaeology you uncover the unknown. In diplomacy you cover the known.
28.The nice part about being a pessimist is that you are constantly being either proven right or pleasantly surprised.
- George F. Will
29.Basic research is what I am doing when I don't know what I am doing.
30.It's so much easier to suggest solutions when you don't know too much about the problem.
31.Behind every great fortune there is a crime.
- Honore de Balzac
32.Reading made Don Quixote a gentleman. Believing what he read made him mad.
- George Bernard Shaw
33.The male is a domestic animal which, if treated with firmness, can be trained to do most things.
- Jilly Cooper
34.A husband is like a fire, he goes out when unattended.
- Evan Esar
35.The secret of eternal youth is arrested development.
36.Q:What is common between a Government Employee and a sperm? Ans:One in a million actually work!

Monday, January 11, 2010

सवाई गंधर्व महोत्सव २०१०

गेली ५७ वर्ष अखंड चालू असणारा सवाई गंधर्व महोत्सव या वर्षी ७-१० जानेवारी या कालावधीत रमण बाग प्रशाळेच्या प्रांगणत रंगला होता. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या संकल्पनेतून आणि आर्य संगीत प्रसारक मंडळ यांच्या सहयोगातून स्थापन झालेल्या या महोत्सवात संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी आजवर हजेरी लावली आहे.
महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी असा गौरव असणार्या पुणे शहराचा हा मानबिंदू असणार्‍या या महोत्सवाचा आनंद लुटण्याची अनेक वर्षाची इच्छा ८ तारखेला पूर्ण झाली. महोत्सवाच्या दुसर्‍या सत्रास जायचे असे माझे आणि मित्राचे ठरले. कचेरीतून gate -pass घेऊन लवकर निघता यावे म्हणून सकाळी लवकर उठून वेळेच्या आधीच कचेरीत पोहोचलो.खरे कारण संगितल्याने आणि सर सुद्धा संगीताचे चाहते असल्याने काहीही खळखळ न करता त्यांनी लवकर निघण्याची परवानगी दिली. सहसा वेळेवर न येणारा मित्र केवळ या महोत्सवाच्या निमित्ताने माझया कचेरीत वेळेवर आला. आणि आमची स्वारी कार्यक्रमाच्या ठिकाणी ४ च्या आधी अर्धा तास दाखल झाली.
शुक्रवार,८ जानेवारी २०१०,सायंकाळी ४ वाजत रु.१०० ची प्रवेशिका घेऊन आम्ही भारतीय बैठक घालून स्थानापन्न झालो. 'जिथे कमी तिथे आम्ही' या उक्ती नुसार गर्दी कमी असणार्‍या परंतू कार्यक्रम व्यवस्थित दिसणार्‍या जागेची निवड आम्ही केली होती. रसिक आणि चोखंदळ पुणेकरांनी चटई, सतरंजी,पिशवी पसरून स्वतःची जागा आरक्षित केली होती. निमंत्रितांसाठी राखीव ,सोफा सेट , खुर्ची ,भारतीय बैठक अशी बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सलग ६-७ तास असणार्या कार्यक्रमाचा श्रोत्यांना त्रास होऊ नये म्हणून मंडपाबाहेर खाद्यपदार्थांच्या छोटी दुकाने, स्वच्छता गृहे (उत्तम स्थितीत असणार्या आणि दुर्गंधी मुक्त) यांची व्यवस्था संयोजकांनी उत्तम प्रकारे केली होती. दर्जेदार ध्वनी क्षेपक यंत्रणा आणि कार्यक्रमाचे अगदी मंडपाच्या शेवटपर्यंत प्रसारण होईल असे क्लोज़ सर्किट दूरदर्शन संच योग्या ठिकाणी लावण्यात आले होते.

नियोजित वेळेप्रमाणे ठीक ४ वाजता सूत्रसंचालकांनी ध्वनी प्रक्षेपकचा ताबा घेतला. भारदस्त आवाज लाभलेल्या सूत्रसंचालकांनी कार्यक्रमाची रूप रेषा थोडक्यात पण महत्वाच्या गोष्टीनी स्पष्ट केली. आणि ४:१५ सुमारास पंडित राजेंद्र कान्दल्गावकर यांनी त्यांच्या गायकीला प्रारंभ केला. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशीचे पहिले पुष्प पंडित -कान्दल्गावकर यांनीआपल्या कमावलेल्या गायकीने रसिकांसमोर पेश केले. मला स्वतःला शास्त्रीय संगीताची फारशी जाण नसतांनाही मी त्या संगीत मैफीलीत मुग्ध झालो , आणि शास्त्रीय संगीताच्या ताकदीची मला नव्याने जाणीव झाली. पंडित कान्दल्गावकरानी राग मुल्तानी आळवायला सुरूवात केली , आणि कार्यक्रम दर्जेदार होणार याची खात्री पटली. स्वर आणि ताल यांवर जबरदस्त हुकुमत, योग्य दमसास आणि अभिजात गायकी यांचा मिलाफ पंडितांच्या गायकीत अनुभवायला मिळाला. साधारण सव्वा तास चाललेल्या त्यांच्या गायकीला पुणेकर रसिकांची दाद मिळाली ती २-३ मिनिट गर्जणार्‍या टाळ्यांची.

त्यानंतरचे दुसरे पुष्प ओवले ते खुद्द पंडित भीमसेन जोशींचे सुपुत्र म्हणजेच श्रीनिवास भीमसेन जोशी यांनी. पित्याच्या किराणा घराण्याचा वारसा तितक्याच ताकदीने चालवणार्या या गायकला श्रोतृ वृंदाने अनेकवेळा दाद दिली. याच वेळेस जोशींच्या तिसर्‍या पिढीतील उभारता तारा विराज श्रीनिवास जोशी वय वर्ष साधारण ५-६ याने सक्रिय साथ दिली. प्रोत्सहन्पर म्हणून त्याला कुणी एका दर्दि व्यक्तीने रु. १००१ ची भेट बहाल केली. याच भागात पंडित श्रीनिवास भीमसेन जोशी यांनी शेवटच्या २५ मिनिटांत पंडित भीमसेन जोशींवर आधारित प्रत्येकी ५ मिनिटांच्या ४ बंदिशी सादर केल्या. त्यात ख्यातनाम व्यक्तींना पंडित भीमसेन जोशींचे झालेले दर्शन, पंडित भीमसेन जोशींचा अबोल स्वभाव, त्यांनी लहानपणापासून आजवर कलेचा साधक म्हणून केलेला प्रवास याचा समावेश केला होता. माझ्या सारख्या नवख्या आणि हौष्या लोकांना नेमक काय चालल आहे हे समजावे म्हणून पंडित श्रीनिवास जोशी यांनी या बंदिशी तपशीलवार उलगडून दाखविल्या. माऊली टाकळकर या टाळ वादकाची विनंती नाकारणे किती अवघड आहे याचे प्रत्यंतर त्यांनी टाळ वाजवाल्यानंतर आले. (मी जो टाळ गणपतीत वाजावतो त्याला टाळ कूटणे म्हणतात याची जाणीव मला झाली.)अवीट गोडीच्या 'माझे माहेर पंढारी' हा अभंग त्यांनी टाळ श्रीनिवास जोशी यांच्या कडून गाऊन घेतला.
पंडित हरिप्रसाद चौरासिया यांना तबल्यावर साथ करणार आहेत श्री. घाटे आणि मृदुंगवादाक आहेत पंडित भवानीशंकर अशी अगदी आयत्या वेळी जाहीर झाले आणि रसिकांच्या आनंदला परावर उरला नाही. भगवान श्री कृष्णाच्या बासरी वादना नंतर लोकांना मोहित करण्याचे सामर्थ्य कुणाच्या बासरीवादनात असेल तर ते म्हणजे पंडित हरिप्रसाद चौरासिया. त्याची अनुभूती 'याची देही याची डोळा' अनुभवायला मिळाली. त्यांनी घातलेली पहिली फुंकरच रसिक प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेऊन गेली. पहिली २० मिनिटे केवळ बासरीचे सूर मंडपात गुंजत असताना पंडित भवानीशंकर यांनी मृदुंगावर थाप मारली आणि दर्दि रसिकांच्या गर्दीचा नुरच पालटला. त्यांच्या जुगलबंदीला अनेकवेळेला टाळ्यांची दाद मिळाली. त्यानंतर घाटे यांचे तबला वादन आणि पंडित हरिप्रसाद चौरासिया यांची बासरी याने मंडपचे वातावरण भरून गेले. सलग सव्वा तास बासरी वादन करूनही त्यांच्यावर थकव्यचा परिणाम जाणवून येत नव्हता. प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन त्यानी नंतर 'दुर्गा ' राग सादर केला. आणि संपूर्ण श्रोतृवृंदाची ब्रह्मानंद टाळी लागली. यात तीन ही कलाकारांनी एकमेकांवर कुरघोडी न करता कला सादर केली. आणि प्रेक्षक मायबापांना स्वर्गीय सुखात न्हाऊ घातले. कार्यक्रमाच्या शेवटी पंडित हरिप्रसाद चौरासियांच्या हस्ते एका सीडी चे अनावरण झाले.
पंडिता मालिनी राजूरकर यांनी त्या दिवशीचे चौथे आणि अंतिम पुष्प त्यांच्या गायाकीने गुन्फले. स्वर्गीय सुखाची अनुभूतीआणि अंगावर रोमांच उभे राहणे म्हणजे काय याचा प्रत्ययकारी अनुभव त्यादिवशी मी आणि माझ्या मित्राने अनुभवले. दुचाकीवरुन रात्री घरी जाताना आमची वेगळीच अवस्था झाली होती . घाईगर्दी ,हेवेदावे यातून आम्ही दूर फेकल्यासारखे झालो होतो. आपसूकच मौनव्रत आमच्याकडून धारण झाले होते.
शास्त्रीय संगीतातून आम्हाला चार क्षण सुखाचे, आनाडाचे देणार्या सर्व महान कलावंतांना हा ब्लॉग अर्पण.

(ता.. क.- कार्यक्रम स्ंपल्यानंतर कुणी तरी म्हणले पैसे वसूल, वाईट एकाच गोष्टीच वाटत की असे स्वर्गीय सुख सुधा या मतलबी जगात लोक पैशात मोजतत. असो!)