Monday, March 29, 2010

२७-०३-२०१०- किल्ले रायगड

महाबळेश्वर की रायगड? या चर्चेत अखेर रायगडाची सरशी झाली आणि भवती न भवती होत, शनिवार दिनांक २७ मार्च रोजी आम्ही (पवन,सिजो,गगन,आशिफ,रोहन,गणेश,विवेक,विन्सी,अशीता) तिथे जायचे मुक्रर केले. चर्चा झाल्या ,गप्पा रंगल्या आणि उरलेल्या वेळात सहलीचे नियोजन करून प्रत्येकी एक ठराविक रक्कम काढण्याचे ठरले. शुक्रवारी संध्याकाळीच गाडीची सफाई,इंधन भरणे,खाण्याचे पदार्थ(फक्त खाण्याचे) विकत आणणे इत्यादी सोपस्कार पूर्ण झाले आणि दुसर्या दिवशी सकाळी ठीक ६:०० वाजता कचेरीजवळ एकत्र यायचे निश्चित झiले.
संस्थाने जरी खालसा झाली असली,तरी संस्थानिकांचा आळशीपणा अंगात मुरल्यामुळे म्हणा ६:४५ (भारतीय प्रमाण वेळेनुसार ६:००) वाजता आम्ही सर्व एकञ अलो. ज्या गाडीने आम्ही जाणार होतो ती विन्सिची वैयक्तिक मालमत्ता असल्याने तिचे सारथ्य ती स्वतः करणार होती.अर्थात बाकी कुणाला चार चाकी गाडी चालवता येत नाही ही गोष्ट निराळी! उदबत्ती लावून गाडीची पूजा केली. चांदणी चौक-मुळशी-तम्हिनी घाटा मार्गे कोकणात उतरायचे आणि निजामपुरच्या फाट्यावरून पाचड कडे कूच करायचे अशी मार्ग क्रमणा आम्ही नकाशात दाखवली होती.
प्रवासाला सुरूवात केल्यापासून १ तासाच्या आत (५५ मिनिटे) मुळशीला पोहोचलों. मागील वर्षीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ज्या ठिकाणी १ वर्षापूर्वी नाश्ता केला होता तिथे जरा वेळ थांबलो. चहा नाश्ता तयार होईपर्यंत धरणाच्या पाण्यात हात पाय धुण्याचा कार्यक्रम सर्वांनी उरकून घेतला. थोडीफार छायाचित्रे घेतली आणि या अल्पविरामानंतर पुन्हा प्रवास सुरू झला. विन्सीच्या सारथ्य बद्दल शंका घ्यायला वाव नसल्याने गाडीत धिंगण्याला ऊत आला होता. ताम्हिनीच्या अवघड घाटात देखील ती सफाईदार पणे गाडी हाकत होती.(याचा साक्षीदार मी स्वतः पुढे बसल्याने मला या पूर्वीही आला होता.)मागील सहलीत ७ वेळा उलट्या काढणार्या प्रशांतची सर्वाना हटकून आठवण येत होती.पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यना जोडणार्या रा.म. १७ वर असणार्या माणगावच्या अलीकडे साधारण १० किमी वर निजामपूर हे गाव आहे.तेथून डावीकडे पाचडला जायला फाटा फुटतो.३२-३५ किमी च्या या प्रवासाला आम्हाला सव्वा तास लागला. अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता आणि उंच -सखल आणि वेडी वाकडी वळणे यामुळे विन्सीच्या गाडी चालवण्याच्या कौशल्याचा कस लागला.
रायगड पासून १ किमी आधी पाचड या गावी महाराजांच्या मातु:श्री जिजाबाई यांची समाधी अहे.तेथे ग्राम पंचायतीने एक छोटेसे उद्यान विकसित केले अहे.तेथुन किंचित पुढे गेल्यावर लगेचच रायगडचा पायथा आम्हाला खुणावू लागला होत.परन्तु रज्जुरथाने जायचे असल्याने आम्ही पायथ्या जवळ न जाता गडाच्या मागच्या बाजूला गेलो. गाडी सावलीत लावून प्रत्येकी १५० रुपयाची ९ तिकिटे काढली आणि झुलत्या पाळण्याची आमची प्रतीक्षा सुरू झाली .कहि वेळातच एकमेकांना जोडलेले २ निळ्या रंगाचे झुले गडाच्या वरच्या बाजूने सरकत खाली अले. रज्जुरथाने (ROPE WAY) पहिल्यांदाच प्रवास करायचा असल्याने प्रत्येकाने आपल्या आवडत्या देवाचे स्मरण करून वर (अर्थात गडावर) जायला सुरूवात केली.५०० मीटर चे हे अंतर कापायला ४ मिनिटांचा अवधी लागतो. तितक्या वेळात अचानक हवेचा दाब कमी झल्याने अशीता आणि विन्सीच्या कानाला थोडी बधीरता आली य छोट्याश्या प्रवासात खाली बघताना मात्रा मनात अंधुक भीती प्रत्येकाला चाटून गेली. गडावर आल्यावर एका उपाहार गृहात थोडा फराळ केला. शनिवारी करत असलेल्या उपवासाला नाइलाजाने त्या दिवशी मला तिलांजली द्यावी लiगलि. काळात दुर्बिन घेऊन मी गडाच्या आसपासचा परिसर बघून घेतलi.खोल आणि अस्ताव्यस्त पसरलेल्या सह्य पर्वत रंगांच्या दरम्यान अगदी लांबच्या डोंगरावर काहीतरी हलताना दिसले होते. दुरबिनीतून पहिल्यानाणतर तो एक झेंडा असल्याचे आढळून आले.
३० लोकांचा समुह जमा झाल्याशिवाय किल्ला दाखवायचा नाही या दळभद्रि नियमाचे उल्लंघन करून आम्हा ९ जणानसह आणखी ४ लोकांना गड दाखवायचा निर्णय तिथल्या मार्गदर्शकाने घेतला. ४०-५० पायर्या चढून गेल्यावर (हे करताना परत प्रत्येकी ५ रु. चे तिकीट घ्यावे लागते.) आम्ही सर्व एका भव्य परंतु पडक्या अवशेषंजवळ आलो.घसi खाकारण्याचा बहाणा करून मार्गदर्शकाने आमचे विचलित लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आणि पढवलेल्या पोपटाप्रमाणे त्याने माहिती देण्यास सुरूवात केली. रायगडावरघडलेल्या प्रसंगात अगदी तो हजार होता आणि त्या सगळ्या प्रकारचे संकलन त्यानेच केले आहे अशा थाटात त्याने आवाजात चढ- उतार आणून आमच्यातल्या काही जन्नाना आकृष्ट करण्यात त्याने यश मिळवले, पणथोडे फार वाचन झल्याने त्याने सांगितलेल्या माहिती ची सत्यता मी पडताळुन पाहत होतो नि १-२ दा त्याला खोट ठरविल्यने मी स्वत्तःच माझी पाठ थोपाटून घेतली. महाराजांच्या ८ राण्यांपैकी ६ राण्याच्या खोल्या,दिवाण-ए-आम,दिवाण-ए-खास,धाण्याचे कोठार,बंदिवनांसाठीचा तुरुंग,७ माजली दीपमाळ,दारूचे(शस्त्रास्त्रे) कोठार,पाण्याचा तलाव,महाराजांचे स्नान गृह आणि त्यालाच जोडुन असलेले स्वच्छता गृह(मार्गदर्शकच्या भाषेत BATHROOM ATTACHED WITH W.C.) त्याने दाखवल्या नंतर आम्हाला त्याने राज दरबारात आमंत्रित केले. महाराजांच्या राज्याभिषेकाचे सांगोपांग वर्णन ऐकून झाल्यानंतर पादञाण काढून आम्ही राजांचे मेघडंबरीतील बैठ्या पुतळ्याचे दर्शन घेतले. नुसता निर्जीव पुतळा पाहुनही मान आदराने तुकवली गेली आणि आपसूकच सगळ्यांच्या तोंडातून एकाच वेळी महाराजांचा जयजयकार राजदरबारात घुमलi. बर्याच दिवसांपासुनचा मानसिक कंटाळा आणि वैचारिक शैथिल्य या घटनेने दूर सरले गेले. गडाची बांधणी,दूरदृष्टी, स्थापत्या कलेचे कौशल्य,जनतेची काळजी या गुणंi बरोबरच राजांचे युद्धा नैपुण्य ,विचारांची झेप आणि प्रत्यक्ष कृती यांचा ठायीठायी अनुभव येत होत. उगाच नाही त्याना जाणता राजा म्हणत.४४ खणी (दुकाने) असलेल्या बाजार पेठेजवळच राजांचा सिंहसन आरूढ पुतळा तळपत्या उन्हात झळाळून दिसत होता. मुद्रेवरचे करारी भाव आणि डोळ्या तील जरब लक्ष वेधून घेत होती.

नमस्कार करून आम्ही निघणiर तेवढ्यात आमच्या मार्गदर्शकाने कवी भूषण याने लिहिलेले शिवगान खरड्या आवाजात गाऊन दाखवले. या भiरवलेल्या वातावरणात मात्र काहीतरी नाही याची जाणीव आम्हाला झाली होती,तेव्हा एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आमच्या बरोबरीने असणार्या जोडप्याने हळूच कुठेतरी पळ काढला होत. त्यांचा शोध घ्यायचा व्यर्थ प्रयत्न आम्ही काही केले नाहीत हे सांगणे न लगे.
त्यांचा नाद सोडून मग आम्ही गडाच्या एका टोकाला असलेल्या जगदिश्वरच्या आणि महाराजांच्या समाधी मंदिराकाडे कूच केलि.जगदिश्वरच्य मंदिरासमोर असलेल्या भग्न नन्दीचे दर्शन घेऊन मंदिराच्या गाभर्यत प्रवेश करते झालो. मित्र परिवार अनेक धर्मीय असला तरीही प्रत्येकाने अगदी मनापासून मंदिरात प्रवेश केला. मी आणि रोहन ने मनापासून "ओम" या मंत्राचे पठान केले.ते झाल्यानंतर अगदी जवळ असणार्या महाराजांच्या पवित्र समाधीचे दर्शन घेतले. जवळच त्यांच्या विश्वासू वाघ्या कुत्र्याची समाधी पहिली.
जवळच असणार्या भिंतीवर संस्कृत आणि पाली भाषेत शिवराज्याभिषेकाविषयीचे वर्णन कोरले होते.एक पायरीवर गडाचे बांधकाम केलेल्या हिरोजी इंदलकरांच्या नावाची पiटी होति. फालतू हव्यासापोटी कापडी फलकावर नाव लिहून तेही पैसे देऊन आपली स्वतःची जाहिरातबाजी करणार्या तथाकथित नेत्यांच्या प्रसिद्धीची आणि बुद्धीची मला त्यावेळी कीव आली.त्यानंतर आमची छायाचित्रे काढून घ्यायची स्पर्धा सुरू झाली.हे चालू असताना खाण्यासाठी आणलेल्या पदार्थांचा एका बाजूला फडशा पडला जात होतi.. वाटेत असणार्या दुकानांमधून सरबत आणि थंड पेयांचा आस्वद ही आम्ही घेत होतो. नंतर मग टकमक टोक,हिरकणीचा बुरूज बघून आमची परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली.हे सगळे बघताना मला आठवण येत होती ती म्हणजे आपल्या आमोघ वाणीने शिवचरित्र जिवंत करणार्या बाबासाहेब पुरंदरे यांची. त्यांच्या कल्पक डोक्यातून उभ्या राहिलेल्या या प्रकल्पामुळे अनेकांना इतिहास ज्ञात झाला.
सलग ४-५ तास झालेल्या तंगडतोडीमुळे नाही म्हणाल तरी प्रत्येकाला थोडा थकवा जाणवायला लागला होता. तेव्हा गडावरच झोप येण्यापूर्वी खाली जाण्याचा सूज्ञ निर्णय आम्ही घेतला आणि ५:३० ला रज्जुरथाने परत खाली आलो. परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली होती. परत येताना पाचाड-माणगाव-निजामपुर्या थोड्या लांबच्या परंतु सुरक्षित मार्गाने प्रवास सुरू केला. रा. म. १७ वर एका ठिकाणी थांबून खाडीत नंगरून पडलेल्या बोटीवर छायाचित्रे घेतली. माणगाव ला आल्यानंतर पोटात ओरडत असणार्या कावळ्यांना पाव भाजीचा नैवेद्य यथेच्छ खाऊ घातल. नंतर मात्र अंधारची पर्वा न करता आणि मुक्कामाला पुण्यात परत यायच्या उद्देशाने वेगाने गाडी चालवून १०:३० च्या सुमारास पुण्यात परत आलो. निगडीला परत यायचे असल्यामुळे मी बाकी सवंगड्यांचा निरोप घेऊन मी बसमध्ये बसलो. आणि घरी परत येताना आणखीन एक घटना घडली की ज्यामुळे मला बस सोडून डेक्कन ला उतरावे लगले. ती घटना सांगेन पण पुन्हा कधी तरी!

(यi लेखामध्ये गडाचे अतिशय त्रोटक वर्णन केले आहे, ते केवळ त्यावर अनेक अभ्यासू आणि ज्ञानी लोकांनी केलेल्या वर्णनामुळे!)

13 comments:

Tushar said...

Lekh Uttam Aahe.
Aata tuzyakadun Maharajanvaril Abhyasatmak lekhachi apeksha aahe.

vaishali sajjan said...

atishay sundar, apratim, tu khup chan lihu shakatos, mala ase vatate ki tuzasarkhya mulane nehami lihit rahave.

Unknown said...

Ekdum bhari.... Vachta vachta me pan akkhhi Raigad trip keli atta... Mast lihitos re... Kahi marathi shabda jad jatat kalayla , pan aso... khupach chan... Keep writing... Great going... Pawan the LEKHAK....:)

अश्विनी said...

मस्त! धावत धावत रायगडला जाऊन आल्यासारखं वाटलं!
-अश्विनी

Dipti said...

NAMASKAR, PAVAN...
KHUPACH UTTAM LIKHAN KELE AAHES...
AATA TU ASECH LIKHAN TUJHYA DAINANDIN JEEVANAT GHADALELYA GAMTIDAR GOSHTINBADDAL SUDDHA KAR..
KARAN TUJHYAKADE MANDANI KARNYACHE KAUSHALYA AAHE....KHUP SHUBHECHA....:)

Prachii said...

Lekh cchanach zalay..Oghavati shaili mhantat ti ashich ase vatte..pan thoda tratak ahe barr!!
Ani hava tase change milala na tula??

Prachii said...

Lekh cchanach zalay..Oghavati shaili mhantat ti ashich ase vatte..pan thoda tratak ahe barr!!
Ani hava tase change milala na tula??

Omkar Mandke said...

tu aani Marathi bhasha bhau bahin aahat...var pasun khal paryanta ek mekana olakhata... Marathi cha uttam vapar kela aahes... kahi thikani khupach jud shabdaprayog aahet... but kharach Raigad firlyasarkhe vatle... ajun photos chi kami bhasli...specially like your last trip...:)
all the best and keep going..
Omkar

Unknown said...

Khup chhan!!! Kharach Raigadla jaun alyasarkha vatal...felt like I was there when I was reading ur blog.. Keep it up!!!! :)

Rg said...

चला माझा सल्ला उपयोगी पडला अस म्हणाव लागेल. अणि खुप दिवसांच्या प्रतिक्षेत असलेला पवनचा ब्लॉग वाचायल मिळाला. असच लिहित जा. १-२ चूका होत्या पण दुर्लक्ष करण्या इतपत होत्या त्यामुले बाकीच्या ब्लोग्ची मजा नहीं घालवत.

Rg said...

चला माझा सल्ला उपयोगी पडला अस म्हणाव लागेल. अणि खुप दिवसांच्या प्रतिक्षेत असलेला पवनचा ब्लॉग वाचायल मिळाला. असच लिहित जा. १-२ चूका होत्या पण दुर्लक्ष करण्या इतपत होत्या त्यामुले बाकीच्या ब्लोग्ची मजा नहीं घालवत.

Anonymous said...

Lekh cchanach ahe...khupach sundar vichar mandle ahes...
writen very well...hope u maintain the enthu.....and except that you keep on posting your thoughts...

ABHIJEET GUJAR said...

Atishay surekh lekh lihila aahes...

Pu La nantar Pa Gh he naaw suddha nakkich marathi sahityala rangat aanu shakate hyat til matr shanka nahi...

khoti stuti mulich karat nahiye me...

Pavanya tuzya aatalya kalakarala jaga kar ase tula saangitale tar tu lagechch he tuze kshetra nahi mhanun palata paay kadhashil mhanun me tula tase kahi mhanar nahi...


Honestly keep writing ewadhech saangen...