९ जून १९८४,शनिवार,दुपारी १:१० मिनिटांनी माझा या मर्त्य जगात प्रवेश झाल.तो सोहळा साजरा करण्यासाठी काल रात्री ११:५५ पासून ते जवळपास १:३० पर्यंत अनेक शुभेच्छुक आप्त् मित्र आणि मैत्रिणिंचे शुभेच्छा दूरध्वनी आणि संदेशांच्या मार्फत मिळाल्या. त्या सर्वाना एकाच वेळी धन्यवाद द्यायचे या हेतूने आजचा ब्लॉग.
रात्रभर शुभेच्छा स्वीकारल्याने नंतर झोप येणार नव्हतिच.तेव्ह आत्मपरीक्षण करण्याचे ठरले. गेल्या २६ वर्षांचा लेखाजोखा मांडतांना अनेक आठवणींचा पट डोळ्यासमोर चलचित्रपटाप्रमाणे सरकून गेला. त्यात अनेक चांगल्या गोष्टीन प्रमाणे नको असलेल्या घटना पण स्वच्छ आठवत होत्या. आई आणि बाबंकडून झालेल्या संस्कारणंतर शाळेत मिळालेले धडे आणि नंतर किशोर वयात असताना मित्रांची संगत आणि कॉलेज मध्ये असताना केलेली आणि शिकलेली प्रॅक्टिकल थेअरी यांच्या शिदोरीवर आजपर्यंतचा प्रवास झाला. कधी टक्केटोणापे खोऊन तर कधी शाबासकीची मिळालेली थाप यांसारख्या गोष्टीतून अनुभव विश्व समृढा झाले.
THEY SAY “LIFE IS BEAUTIFUL ” BUT I THINK YOU HAVE TO SACRIFICE A LOT TO MAKE IT BEAUTIFUL.
या २६ वर्षात अनेक भले बुरे अनुभव गाठी शी जमा झाले. आपल्या म्हणणार्या माणसांकडून केसा नी गळा कपला गेला तर अनेक अनोळखी व्यक्ती ऐन वेळी मदतीला धावल्या तेही परतफेडीची अपेक्षा ना करता. कधी तरी अत्यंत कंटाळवाण्या वाटनर्या जीवनाच्या शुष्क वाळवंटात मारुद्यान सुधा अनुभवले. २ वेळा झॅलेल्या अपघातांमधून कुटुंबाच्या आणि मित्रांच्या मदतीने उभा राहिलो. काही कमावले काही गमावले. पण त्यातून बराच काही शिकायला मिळाले.
तुमच्यासारख्या मित्रांमुळे आणि शुभेच्छा मुळे जगण्याची उमेद वाढते.
तुमचा सहवास आणि शुभेच्छांच्या ओझ्यात राहायला मला नेहमीच आवडेल.
आपला कृपा अभिलाशि,
पवन दिनेश घवी.



6 comments:
Kya baat hai Pavan. Nice pics. i think you are with your father there
Kya baat hai Pavan, Nice pic. I you are with your father there.
Sahi hai Pavan. Very nice pics. I think thats you father with you!
NO man,He is my Uncle.
He Loves me a lot.
Are Pavan , lahanpana sarkhi tabyet banav jara...hahaha. BAKI CHAN LIHILAY.
Cchan lihile ahe..ani kharach ayush sunder banvayala swat kasht ghyave lagtat...
Aso, anek anek hardik shubheccha!!
Post a Comment